breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपातर्फे पाठिंबा

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केला पाठिंबा
  • दुकाने चालू ठेवण्याची वेळ वाढवावी यासाठी केले होते व्यापाऱ्यांनी आंदोलन

पिंपरी| प्रतिनिधी

दुकाने चालू ठेवण्याची वेळ वाढवावी यासाठी पिंपरी चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. यासाठी या व्यापाऱ्यांना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.याबाबत सविस्तर निवेदन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सादर केले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील आणि महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांना व्यापारी शिष्ट मंडळाने भेट घेतली. व्यापारी पिपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन केले . कोविड १९ आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत आम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी होता आले नाही. आंदोलनस्थळी गर्दी करता येणार नाही त्यामुळे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या आंदोलनाला उपस्थित राहू शकते नाहीत. मात्र आमचा या
आंदोलनाला पाठिंबा आहे.

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षभरापासून असलेले नियम काही अंशी कमी केलेले असले तरी दुकाणे चालू ठेवण्याची वेळ कमी असल्यामुळे आजही व्यापाऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आज शहरामध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु हि वेळ सायंकाळी ८ वाजे पर्यंत आणि विकएंड लॉकडाऊन कमी करावे यासाठी व्यावसायिकांनी या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनास भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडचा पाठिंबा आहे.

व्यापारी दुकानदार, स्टॉलधारक आणि छोटे व्यावसायिक यांची विस्कटलेली घडी आता कुठे सुरळीत होताना दिसत होती .परंतु कोरोना निर्बंध यामुळे व्यवसायिकांचे अर्थचक्र कोलमडताना दिसत आहे. प्रशासन आणि सरकारने व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचाही विचार केला पाहिजे. शहरातील केवळ निर्बंध हा उपाय ठरणार नाही. त्यामुळे शहरातील दुकाने चालू ठेवण्याची वेळ साय. ८ वाजेपर्यंत वाढवावी व विकएंड लॉकडाऊन कमी करावे यासाठी केलेल्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे. असे आमदार लांडगे यांनी म्हंटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button