पिंपरी / चिंचवड

भांडण सोडविल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण

पिंपरी | प्रतिनिधी

भांडण सोडविल्याच्या रागातून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री दहा वाजता गुरुदत्त वॉशिंग सेंटर, वाल्हेकरवाडी येथे घडली.

सौरभ गोपाळ नढे (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजिंक्य बाजीराव वाल्हेकर, दुर्गेश सुर्वे, महादेव तुपे, निखील वायदंडे (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 28 एप्रिल रोजी आकाश खैरे आणि अजिंक्य वाल्हेकर यांचे भांडण सोडवले होते. त्याचा राग अजिंक्य वाल्हेकर याच्या मनात होता. शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी जेवण करून गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे बसले असताना आरोपी अजिंक्य त्याच्या तीन साथीदारांना घेऊन आला. चौघांनी मिळून फिर्यादी यांना कोयत्याने, दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button