पिंपरी / चिंचवड
चाकण मधील माणिक चौकात पायी जाणा-या तरुणीशी गैरवर्तन
पिंपरी | प्रतिनिधी
चाकण येथील माणिक चौकात शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेआठ वाजता पायी चालत जात असलेल्या तरुणीसोबत एका अनोळखी व्यक्तीने गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.
याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी कामावरून घरी पायी चालत जात होत्या. त्या चाकण मधील माणिक चौक येथे आल्या असता एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांना पकडून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.