breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#YesBankCrisis | वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

मुंबई | Yes Bank गैरव्यवहारप्रकरणी वाधवान बंधूंना CBIने ताब्यात घेतलं आहे. कपिल आणि धीरज वाधवान यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

येस बँकेत कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी गैरव्यवहार केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महाबळेश्वरला केलेल्या प्रकरामुळे देखील त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या प्रक्रियेत सातारा पोलिसांनी मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात आवश्यक असलेले सर्व नियम पाळले जात आहेत. एवढंच नव्हे तर १+३ असा प्रवास करणार असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. तसेच वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वरपर्यंत केलेला प्रवास भोवणार आहे. डीएचएफएल कंपनी आणि येस बँक फसवणूक प्रकरणात जामिनावर असलेल्या बंधू धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांनी कुटुंबाच्या आपत्कालीन परिस्थितीचे कारण सांगून खंडाळ्याहून महाबळेश्वरकडे जाण्यास परवानगी मिळाली होती. मात्र, चौकशीत काही बाब उघड झाली आहे.

अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे संचारबंदीच्या कलम १४४चा भंग केला आहे. तसेच लॉकडाऊन काळात जारी करण्यात आलेले कलम १८८चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येस बँकेच्या फसवणुकीप्रकरणी वाधवान भावांविरोधात सीबीआयने लूक आऊट नोटीस बजावली आहे. असे असताना गुप्ता यांनी परवानगी कशी दिली, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व २३ सदस्यांना सेंट झेवियर्स हायस्कूलमधील अलग ठेवण्याचा विचारही होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button