breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

कोरोनाच्या संकटाला संधी बनवत नवीन भारत घडवायचा आहे – मोहन भागवत

नागपूर | राष्ट्रीय स्वयम सेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी सायंकाळी कोविड-19 महामारीविषयी ऑनलाइन चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, आता आपणा सर्वांना आता स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. देशातील सर्वांनी विदेशी उत्पादने सोडून, स्वदेशीचा अवलंब करावा. कोरोना संकटाला संधी समजून आपल्याला नवीन भारत तयार करायचा आहे. कोरोनाच्या लढाईत कोणताही भेदभाव न करता आपल्या सर्वांना एकत्र यायचे आहे. सर्वांनी एकत्र राहून नवीन भारत तयार करण्याच्या दिशेने पुढे जायचे आहे.

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वचजण भारतमातेची लेकरे आहेत. ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. दोन्ही बाजूंनी भीती आणि द्वेष पसरवला जाऊ नये. विवेकपूर्ण आणि जबाबदार विचार करणाऱ्यांनी आपापल्या समुदायाला यापासून वाचवले पाहिजे. तसे झाले नाही तर देशात काय घडेल, असा सवाल मोहन भागवत यांनी उपस्थित केला.

‘सरकारने दिलेल्या सूचना सर्वांसाठी आहेत. काही विशिष्ट परिस्थिती सर्वांनाच लाभ मिळावा, याकडेही लक्ष द्यायला हवे. नागरिकांनी आपल्या सवईकंडे लक्ष द्यायला हवे. सर्वांना या महामारीचा अनुभव झाला आहे, याबाबत जनजागृती करण्याकडे सर्वांचा कल असायला हवा. आपल्याला धैर्य ठेवावे लागेल. किती दिवस असाच विचार करू नका, काम करत राहा. आळशी बनू नका, तत्परतेने काम करा. भारताने कोरोनावर तात्काल उपाय केला, त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत देशात कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांप्रमाणे वाढला नाही.’

‘दोन संन्यास्यांची हत्या झाली, यावर अनेकजण आपले मत मांडत आहेत. ही घटना व्हायला नको होती, पोलिस काय करत होते, यात कोणाचा हात आहे, कोण दोषी आहे, कोणाला शिक्षा व्हायला हवी, अशी मत मतांतरे असतात. आपल्याला यावर लक्ष न देता, देश हिताचे काम करायचे आहे. दोन सन्यास्यांची हत्या झाली, ती व्हायला नको होती. पण, आता यावर कोणताही वाद न करता, कायद्याला आपले काम करू द्या आणि आपण समाज हिताची कामे करा.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button