breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘म्हेत्रेवाडी दवाखान्याची तातडीने दुरुस्ती करा’; यश साने यांची ‘फ’ क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे मागणी

पिंपरी : संततधार पावसामुळे म्हेत्रे वस्ती येथील महापालिका दवाखान्याच्या छताला मंगळवारी गळती लागल्याने दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांची मोठी गैरसोय झाली तसेच दवाखान्यातील कागदपत्रांचे नुकसान झाले. स्मार्ट सिटीत अशा घटना घडणे हे प्रशासनाच्या गलथान कारभाराचे उदाहरण आहे.

या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला असतानाही काम का सुरु होत नाही, असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शहराध्यक्ष यश साने यांनी फ क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी सिताराम बहुरे यांच्याकडे उपस्थित केला. दरम्यान, वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तात्काळ दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे बहुरे यांनी सांगितल्याची माहिती साने यांनी दिली.

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे

मंगळवारी म्हेत्रे वस्ती येथील महापालिका दवाखान्याच्या छताला गळती लागली. त्यामुळे वैद्यकीय उपचार आणि तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. शिवाय डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. दवाखान्याच्या दुरवस्थेची माहिती मिळताच यश साने यांनी तात्काळ तेथे धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फ क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी सिताराम बहुले यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

म्हेत्रे वस्ती येथील महापालिका दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी ४५ लाखांचा निधी मंजूर असताना काम का केले जात नाही, असा प्रश्न साने यांनी बहुरे यांना विचारला. त्यावर वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तात्काळ दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे बहुरे यांनी सांगितल्याची माहिती साने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button