breaking-newsमनोरंजन

अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनीच त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने एक ट्वीट केलं आहे. अंकिताच्या या ट्वीटने बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे .

अभिनेत्री अंकिता लोखंडेने “विजय सत्याचाच”, असं ट्वीट केलं आहे. रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिताने हे ट्वीट केलं आहे. अंकिताने केवळ ‘विजय सत्याचाच’ इतकेच लिहिलेला फोटो ट्वीट केला आहे. त्याला कोणताही संदर्भ किंवा हॅशटॅग, मेन्शन नाही. मात्र, सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रियाविरोधात गुन्हा दाखल होताच अंकिताने ट्वीट केल्यामुळे चाहत्यांनी हा संदर्भ जोडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button