breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

WWE मधील स्टार खेळाडू भर समुद्रातून बेपत्ता

कॅलिफोर्निया | WWE या प्रसिद्ध टीव्ही शोमधील स्टार रेसलर आणि अभिनेता शेड गॅसपार्ड हा १७ मे रोजी कॅलिफोर्नियातील एका समुद्रकिनाऱ्यावरुन अचानक गायब झाला आहे. तो आपल्या मुलासह समुद्रात आंघोळ करीत होता मात्र अचानक उसळलेल्या मोठ्या लाटांमध्ये हे दोघेही अडकले. यावेळी त्याच्या मुलाला वाचविण्यात यश आले आहे. पण शेड अद्यापही बेपत्ता आहे. स्थानिक पोलीस तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत आहे पण अद्यापपर्यंत त्याचा काही शोध लागलेला नाही.

जिथं ही घटना घडली आहे तिथून ७० नॉटिकल मैल लांब समुद्री भागात त्याचा शोध सुरु आहे. परंतु सध्या तरी त्याच्या विषयी कोणताही माहिती मिळालेल नाही. कोरोनामुळे कॅलिफोर्नियात देखील लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच यात सूट देण्यात आली होती. त्यामुळे ३९ वर्षीय गॅसपार्ड व्हेनिसच्या मिरिना डेल रे बीचवर कुटुंबासमवेत गेला होता. तो किनाऱ्यापासून ५० यार्ड दूर पोहत होत.

लॉस एंजेलिस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना लाइफगार्ड्सनी शेवटचं पाहिलं तेव्हा एक जोरदार लाट आली आणि नंतर तो त्या लाटेसह वाहून गेला. तेव्हापासून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, शेड सारखा खेळाडू भर समुद्रातून गायब झाल्यामुळे आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. तसेच शेडचे चाहते देखील त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button