breaking-newsताज्या घडामोडीलेख

WOW ! व्हॅलेंटाइनदिनी आकाशात पाहता येणार ‘गुलाबासारखा’ तांबडा तारा…

व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमी युगुलांसाठी किंवा आपल्या सर्वच जवळच्या व्यकिंसाठीचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो…सर्वांसाठीच पर्वणी असतो…या दिवसाची साक्ष स्वत:हा आकाशानं घेतलेली आहे… व्हॅलेंटाइन डे आकाशाही कोणाच्या तरी आठवणीत साजरा करणार आहे…याची साक्ष म्हणून आकाशात व्हॅलेंटाइन डेला गुलाबासारखा तांबडा तारा  दिसतो… व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रात्री ८.१५ ते ८.३० च्या दरम्यान हा तारा आकाशात बरोब्बर मध्यावर येणार आहे.

याला योगायोग म्हणाय किंवा आणखी काही पण हे खऱं आहे…हा बिटलगूज म्हणजेच आर्द्रा तारा दरवर्षी १४ फेब्रुवारीला दक्षिणेकडे आकाशात वर मध्यभागी येतो. मुंबईच्या खगोलतज्ज्ञ अंजनी राव आणि अरविंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा तारा सूर्यापेक्षा ८०० पट मोठा आहे. पृथ्वीपासून तो ६०० प्रकाशवर्षं दूर आहे.

हा बिटलगूज तारा त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आहे. तारा आता जवळपास त्याच्या अंताला पोहोचला आहे. त्याच्या गाभ्यात जास्त वजनाची मूलद्रव्ये तयार होत आहेत. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होत असते की त्याचा आकार कमी जास्त होत असतो. त्याचा प्रकाशही आता कमी झालेला आहे. कारण काही असो …पण या ता-याने आकाशात व्हॅलेंटाइन डेला लावलेली आपली हजेरी खरोखऱचं बघण्यासाखी आहे…

 १४ फेब्रुवारीला संध्याकाळी सव्वाआठ-साडेआठच्या सुमारास दक्षिणे दिशेला तोंड करून वर आकाशाकडे पाहा. तुम्हाला तीन ठळक तारे एका रेषेत दिसतील… तीन ताऱ्यांच्या डावीकडे थोडा वरच्या बाजुला सुंदर लाल झाक असलेला तारा दिसेल. हा साडेआठच्या सुमारास जवळजवळ डोक्यावर असेल. हा तारा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून पाहता येणार आहे.इंग्रजीत या ताऱ्याचं नाव ‘बिटलगूज’ असं आहे. भारतीय खगोलशास्त्रात त्याला आर्द्रा म्हणून ओळखले जाते.खगोलशास्त्रज्ञ या ताऱ्याला ‘रेड जायंट’ नावानेही ओळखतात.

जे कपल्स एकमेकांपासून लांब राहतात, त्यांना हा तारा एकाच वेळी हा तारा आकाशात पाहता येईल आणि आपल्या दूरवरच्या व्हॅलेंटाइनला आठवून तो आपल्या जवळ असण्याची जाणीव करत हा दिवस साजरा करता येईल, असंही अंजनी राव म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button