breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबईराजकारण

चिंताजनक! राज्यात ४९,४४७, तर मुंबईत ९०९० नवे बाधित

मुंबई |

राज्यात करोनाबाधित रुग्णांचा दैनंदिन आकडा हा ४९ हजार ४४७ एवढा असून, २७७ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही चार लाखांवर गेली. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रथमच दिवसभरात ५० हजारांच्या आसपास नवे रुग्ण आणि चार लाखांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्णांची संख्या झाली. दिवसभरात ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

दिवसभरात नाशिक शहर २४५९, पुणे शहर ५७७८, पिंपरी-चिंचवड २७९८, उर्वरित पुणे जिल्हा २२९७, औरंगाबाद शहर ७०४, नांदेड जिल्हा १२१६, नागपूर शहर २८५३ अणि उर्वरित नागपूर जिल्हा १०९०, भंडारा ८३७, बीड ४४८, सातारा ६८८, नंदुरबार ८२०, जळगाव जिल्हा १३०४, नगर जिल्हा १९६४, पनवेल शहर ५६६. मृतांमध्ये सर्वाधिक पुणे शहर ३७, नाशिक शहर १५, औरंगाबाद शहर ३१, नांदेड शहर १३, नागपूर शहर २१, उर्वरित नागपूर जिल्हा १४ जणांचा समावेश आहे.उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ७३,५९९ रुग्ण आहेत. मुंबई ६०,८४६, नाशिक ३१,५१२, औरंगाबाद १४,३०२, नागपूर जिल्हा ५२,४०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

  • मुंबईत मृतांची संख्या वाढली

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दर दिवशी नवनवीन उच्चांक गाठत असताना आता मृतांची संख्याही वाढू लागली आहे. शनिवारी ९०९० नवीन रुग्ण आढळले, तर २७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. शनिवारी ४३ हजार ५९७ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून ६२ हजारांवर पोहोचली आहे, तर करोनामुक्त रुग्णांचा दर घटला असून ८३ टक्के झाला आहे. मुंबईत शनिवारी ९०९० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या चार लाख ४१ हजार २८२ झाली आहे. एका दिवसात ५,३२२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख ६६ हजार ३६५ म्हणजेच ८३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील गंभीर रुग्णांची संख्या ९८२ झाली आहे.

वाचा- देश हादरला! १४ बेपत्ता जवानांचे सापडले मृतदेह; नक्षल्यांच्या घातक हल्ल्यात २२ जवान शहीद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button