breaking-newsTOP NewsUncategorizedमनोरंजन

Superstar Rajnikant B’Day; पंतप्रधानांच्या शुभेच्छा, पाहा अजून कोणी दिल्या शुभेच्छा

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज १२ डिसेंबर ७० वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी त्यांची स्टाइल आणि अभिनयाने अनेकांना अक्षरशः वेड लावणारे एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये त्यांची खूप मोठी क्रेझ आहे. जगभरात त्यांचे चाहते असल्याचे पाहायला मिळते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक कलाकारापर्यंत सर्वांनीच रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना ‘प्रिय रजनीकांत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो’ या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जेष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांनी देखीन ट्विटरद्वारे रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिणात्य चित्रपट अभिनेता महेश बाबू यांनीदेखील रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतमधील लोकप्रिय अभिनेता व्यंकट प्रभू रजनीकांत यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत म्हणाले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा.’

रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये झाला आहे. आज ते ७० वर्षांचे होऊनही ते चित्रपटात काम करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button