TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेराष्ट्रिय

चाकण (खराबवाडी) येथील ऑटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कंपनीचे संचालक उल्हास जोशी, त्यांच्या पत्नी गायत्री जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना योगाचे महत्व व फायदे समजावून सांगितले

चाकण (खराबवाडी) :

चाकण (खराबवाडी) येथील यू टर्न इंडस्ट्रिअल इस्टेट, एमआईडीसी येथील ऑटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सालाबादप्रमाणे या वर्षीही मोठ्या जल्लोषात योगदिवस (21 जून) साजरा करण्यात आला. योगदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलाकार राहुल जोशी यांची उपस्थित होती.

यावेळी यावेळी ऑटर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) गौरव जैन, प्लांट हेड, गणेश मुळे व इतर कर्मचाऱ्याांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. कंपनीचे संचालक उल्हास जोशी आणि त्यांच्या पत्नी गायत्री जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना योगाचे महत्व व फायदे समजावून सांगितले. तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून योग्यरित्या योग करवून घेतला. तसेच ऑटर कंपनीमध्ये “दिवसाची सुरुवात योगाने” या संकल्पनेतून मागील वर्षाच्या योग दिनापासून कंपनीमध्ये नियमित योग उपासना केली जाते.

ऑटर कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीमध्ये 1 लाख 51 हजार 251 सूर्यनमस्कार केले होते आणि तसाच हा उपक्रम यावर्षीही राबवण्यात आला असून सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून 3 लाख 16 हजार 671 सूर्यनमस्कार पूर्ण केले.

कंपनीच्या एकूण 230 कर्मचाऱ्यांनी आणि त्यात 30 महीला कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. तसेच कंपनीच्या परिसरातील बहुतेक कंपन्यांमध्ये उल्हास जोशी यांच्या मार्गदर्शनातून योगाची जागृती करून त्यांनाही प्रोत्साहित केले आणि तेही या उपक्रमात सहभागी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button