breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

World Cup 2023 : भारत वि बांगलादेश यांच्यात आज चुरशीची लढत! पाहा सर्व माहिती..

IND vs BAN : क्रिकेटच्या महासंग्रामाला म्हणजेच आयसीसी विश्वचषकाला ५ ऑक्टोबरपासून सुरवात झाली आहे. आज या विश्वचषकातील १७ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पार पडणार आहे. या दोन्ही संघांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४० सामने खेळले आहेत. या ४० सामन्यांपैकी भारतीय संघाने तब्बल ३१ सामने जिंकले आहेत, तर हातावर मोजता येतील एवढे म्हणजेच फक्त ८ सामने बांगलादेश संघाने जिंकले आहेत. मात्र दोन्ही संघाच्या सामन्यात एक सामना हा अनिर्णित देखील राहिला आहे.

याशिवाय बांगलादेश आणि भारत यांच्यातील आत्तापर्यंत ३ सामने हे भारत देशात झाले आहेत. मात्र हे तीनही सामने टीम इंडियाने जिंकले आहे. त्यामुळे भारतीय संघ वनडे फॉरमॅटमध्ये अव्वलच आहे. अशातच आजचा विश्वचषकातील १७ वा सामना भारत आणि बांगलादेश हा देखील भारतातच होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कौतुकाची बाब म्हणजे पुण्यामध्ये विश्वचषक स्पर्धा ही तब्बल २७ वर्षांनी होत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या पुढे या सामन्यात विजय मिळवणं एक आव्हानातम्कच असणार आहे.

हेही वाचा – भोसरीसह समाविष्ट गावांतील वीज समस्या सुटणार!

हा महामुकाबला कोणत्या मैदानावर खेळवला जाणार आहे?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील महामुकाबला सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या TV चॅनेलवर होणार आहे?

ICC विश्वचषक २०२३ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स 1 HD आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदीवर या चॅनेलवर प्रक्षेपित केले जाणार आहे. सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हे डिज्नी प्लस हॉटस्टार अ‍ॅप आणि अधिकृत वेबसाइटवर होणार आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल , हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन संघ :

लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम , महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button