breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

भारताने भूटान, मालदिवला पाठवली कोरोनाची लस

नवी दिल्ली – भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू आहे. त्यामुळे अवघे जग भारताकडे आशेने पाहत आहे. अशातच भारताने भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,05,95,660 वर

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

दरम्यान, भारत सरकारकडून सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतातील या कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button