breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उमेदवारीवरुन पिंपरीच्या राष्ट्रवादीत उभी फूट; दोघांना एबी फाॅर्म दिल्याने कार्यकर्ते संभ्रमात

हे कसे झाले, मलाच माहिती नाही, शहराध्यक्ष संजोग वाघेरेही अंधारात

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेविक सुलक्षणा शिलवंत-धर या दोघांच्या मागे राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले आहे. परंतू, दोघांच्या उमेदवारीमुळे नेमकी कोणाची उमेदवारी पक्षाने दिली, यावरुन पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षाकडून कोणाला माघार घ्यावी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तसेच या मतदार संघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षात बंडखोरी होत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतर्फे शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली. तर आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांना काल उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुक असलेले माजी आमदार बनसोडे व शेखर ओव्हाळ यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच बंडखोरी करून अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यामुळे पक्षात खलबते झाली आणि उमेदवार बदलण्यात आला.राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह धर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बनसोडे यांनीही एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांनीही आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला माघार घ्यायला लावणार हे 7 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे. यावर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, हे कसं झालं मलाच माहिती नाही. त्यामुळे याविषयी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. असे त्यांनी सांगितले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button