breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Monsoon Session 2023 : अर्ध्या तासातच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आज (१७ जुलै, सोमवार) पासून सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, विधानसभेचं कामकाज सुरू होऊन अर्धा तासात विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभा स्थगित करण्यात आली. यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

हेही वाचा – ‘घटनाबाह्य ‘कलंकीत’ सरकारचा धिक्कार असो!’ विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. दिवंगत खासदार आणि माजी मंत्री गिरीश भालचंद्र बापट, दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर, माजी आमदार शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर (कोळकर), बाबुरावजी जसुजी वाघमारे आणि माजी आमदार रामचंद्र पुनाजी अवसरे यांच्या निधनानंतर विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच संजय शिरसाट, समीर कुनावर, यशवंत माने, अमित जनक यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button