breaking-newsक्रिडा

wimbledon open 2019 : केव्हिन अँडरसन, मारिन चिलीच, कर्बर स्पर्धेबाहेर

लंडन : गतवर्षी उपविजेतेपद पटकावणाऱ्या केव्हिन अँडरसनचे विम्बल्डन टेनिस स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे पुरुष एकेरीत अव्वल १० मानांकित खेळाडूंपैकी सहा जण स्पध्रेबाहेर गेले आहेत.

राफेल नदालने तिसऱ्या विम्बल्डन विजेतेपदाची घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी झालेल्या निक किर्गिओसविरुद्धच्या संघर्षपूर्ण आणि वादग्रस्त सामन्यात नदालने ६-३, ३-६, ७-६ (७/५), ७-६ (७/३) असा विजय मिळवला.

स्पेनच्या ३३ वर्षांच्या नदालला किर्गिओसने अप्रतिम लढत दिली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसने अखिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करताना पंचांच्या निर्णयाबाबत त्यांच्याशी हुज्जत घातली. याचप्रमाणे त्याने अयोग्य पद्धतीने दोनदा सव्‍‌र्हिस केली. विम्बल्डनचा सुवर्णमहोत्सवी सामना जिंकण्याची किमया नदालने साधली.

रॉजर फेडररने ब्रिटनच्या जे क्लार्कचा ६-१, ७-६ (७/३), ६-२ बसा पराभव केला. परंतु मरिन चिलिचला मात्र पराभवाचा धक्का बसला. पोर्तुगालच्या जुवाओ सॉसाने १३व्या मानांकित चिलिचचा ६-४, ६-४, ६-४ असा पाडाव केला.

महिला एकेरीत गतविजेत्या अँजेलिक कर्बरचे आव्हान संपुष्टात आले. लॉरेन डेव्हिसने पाचव्या मानांकित कर्बरचा २-६, ६-२, ६-१ असा पराभव केला.

दिविज शरण उपउपांत्यपूर्व फेरीत

दिविज शरणने मार्सेलो डेमोलिनेरच्या साथीने पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठून भारताचे आव्हान जिवंत राखले आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिविज-मार्सेलो जोडीने तीन तासांच्या आव्हानात्मक लढतीनंतर ब्राझीलच्या सँडेर गिली आणि जोरान व्हिलीगेन जोडीचा ७-६ (१), ५-७, ७-६ (६), ६-४ असा पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button