Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

अनिल परब यांची ‘सीबीआय’ चौकशी होणार?, उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : महाविकास आघाडीतील परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कथित बेकायदा रिसॉर्ट गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, या मागणीसाठी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी दिली. न्यायालयाने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.परब यांनी सरकारी दस्तावेजात बदल करून राज्य सरकारची फसवणूक केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. कोकणातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील जागेवर बिनशेती परवानगी मिळवली. त्याचप्रमाणे शेतीजमीन आहे असे म्हणून तेथे सुमारे २५ कोटींचा उभा केलेला रिसॉर्ट चार वर्षांनंतर परब यांनी मित्र सदानंद कदम यांना एक कोटी १० लाखांत विकला, असा दावा त्यांनी केला आहे.

परब यांनी एक कोटी १० लाख रुपयांत शेतजमीन विकत घेतली. ताबा घेतला, परंतु त्याचा करार १९ जून २०१९ला शेतजमीन म्हणून केला. काही दिवसांत त्या जागेवर १६ हजार ८०० चौरस फुटाचा रिसॉर्ट बांधण्यात आला. साठे यांनी बांधलेला तो रिसॉर्ट आपल्या नावे करावा, असा अर्ज परब यांनी दिला. तो स्थानिक ग्रामपंचायतने स्वीकारला आणि सदरचा रिसॉर्ट त्यांच्या नावावर हस्तांतरित केला. २०१९-२०२०, २०२०-२०२१, २०२१-२०२२ या वर्षांची घरपट्टी, दिवाबत्ती कर, मालमत्ता कर हे सर्व परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरला असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. आपण हा कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर परब यांनी हा रिसॉर्ट तडकाफडकी कदम यांना शेतजमीन म्हणून विकला, असा दावा करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयात धाव घेतल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button