breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीच्या दीपाली धुमाळ

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेविका दीपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. धुमाळ यांच्या निवडीमुळे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा एकदा वारजे-कर्वेनगर प्रभागाला मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यावर या पदावर वर्णी लावून घेण्याकरिता इच्छूकांकडून ‘लॉबिंग’ सुरु करण्यात आले होते. या पदाकरिता खडकवासला विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, वैशाली बनकर, दिपाली धुमाळ या इच्छुक होत्या.

याबाबत पालिकेतील राष्ट्रवादीच्या कक्षात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेता दिलीप बराटे आदी उपस्थित होते. या बैठकीत धुमाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले झाले. धुमाळ यांंनी यापुर्वी महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती, स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा, वृक्ष प्राधिकरण, जैव वैविधता समितीवर काम केले आहे. त्यांचे पती प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ हे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button