breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जे बाळासाहेबांना शक्य झाले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जमणार का? हिंदुहृदयसम्राट म्हणाले होते… ठाकरे कुटुंबीय शिवसेना सोडणार?

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिवसेना (shiv sena) यांच्यासाठी कसोटीचा काळ आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी फक्त महाविकास आघाडीला नाही तर शिवसेनेला मोठा धक्का दिलाय. या सर्व घडामोडींवर काल बुधवारी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकाही आमदाराने समोर येऊन राजीनामा देण्यास सांगितले तर आपण त्या क्षणी राजीनामा देऊ असे म्हटले. इतक नाही तर शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यास सांगितले तर त्याची देखील तयारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेच्या कालच्या वक्तव्यानंतर अनेकांना ३० वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण झाली. १९९२ साली शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते की माझ्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय शिवसेना सोडणार आहे. जाणून घेऊयात तेव्हा काय झाले होते.

शिवसेनेच्या नाराज आमदारांनी आता ज्या कारणामुळे बंडखोरी केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाही, तसेच शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी त्यांची मागणी आहे. १९९२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील अशाच प्रकारची टीका झाली होती. तेव्हा माधव देशपांडे यांनी बाळासाहेब आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशपांडे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर देखील हल्ला चढवला होता. उद्धव आणि राज पक्षाच्या निर्णयात हस्तक्षेप करतात असा आरोप देशपांडे यांनी केला होता. कुटुंबावर अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर बाळासाहेबांनी सामनातून एक लेख लिहाला होता. एक शिवसैनिक जरी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या विरोधात असेल तर आणि तो म्हणत असेल की तुमच्यामुळे मी पक्ष सोडतोय तर याच क्षणी मी शिवसेनेचे अध्यक्षपद सोडतो. माझे संपूर्ण कुटुंबीय शिवसेना सोडले.

बाळासाहेब ठाकरेंच्या त्या लेखानंतर एकच खळबळ उडाली. शिवसैनिकांनी आंदोलन सुरु केले काहींनी आत्महत्येची धमकी दिली. त्या लेखानंतर एक वेगळीच मोहीम सुरू झाली ज्यात बाळासाहेबांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तुमच्या शिवाय शिवसेना असू शकत नाही. शिवसेना भवनाच्या बाहेर लाखो शिवसैनिक बाळासाहेबांच्या समर्थनात घोषणा देऊ लागले. शिवसेनेने अनुभवलेल्या १९९२ मधील घटनेनंतर पक्षाविरोधात कोणी आवाज उठवला नव्हता. आता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवून पुन्हा एकदा पक्ष संघटनेला एकत्र करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आता प्रश्न हाच शिल्लक राहतो की बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे यांना यश मिळेल का? याचे उत्तर मिळण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button