TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

युवकांना मुख्य प्रवाहात आणणार :अनुप मोरे

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी व युवा वॉरियर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनुप मोरे यांचा पुणे शहर युवा मोर्चा व युवा वॉरियर्स यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम शुक्रवार पेठ येथे झाला.युवा वॉरियर्स पुणे शहर अध्यक्ष प्रतिक गुजराथी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक धीरज घाटे, दीपक पोटे, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस प्रतिक देसरडा,सुनील मिश्रा,दीपक पवार,ओंकार केदारी,तुषार रायकर,प्रशांत सुर्वे,सौरभ कुंडलिक,पुणे शहर युवती आघाडी अध्यक्ष निवेदिता एकबोटे ,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना अनुप मोरे म्हणाले,’राष्ट्रवाद आणि देशप्रेम अंगी असणारा युवक घडविण्यास आम्ही प्राधान्य देणार असून भावी काळात मजबूत संघटन उभे केले जाणार आहे.राज्यात युवकांच्या समस्या सोडवून त्यांच्या उर्जेला न्याय देणार आहोत.युवकांना एकत्रित करून युवा मोर्चाची ताकद वाढविण्याचा संकल्प केला असून तो तडीस नेला जाणार आहे. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शेवटच्या कार्यकर्त्यांला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’

जगदीश मुळीक म्हणाले,’ अनुप मोरे यांचा प्रवास संघर्षमय आहे. त्यांनी 2001 साली भारतीय जनता पक्षाचा काम सुरु केले. वॉर्ड अध्यक्ष ते महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस व युवा वॉरियर्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अश्या विविध जबाबदारी घेत त्यांनी पूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांची ओळख निर्माण केली आहे’ .

प्रतिक गुजराथी म्हणाले ,’देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पातुन युवा वॉरियर्स ची सुरवात करण्यात आली आहे. त्याला फेब्रुवारी मध्ये 2 वर्ष होणार आहेत.या काळामध्ये पुणे शहरात 20 शाखा स्थापन करून 10 मेळावे घेतले असून येत्या काळात 18 ते 25 वयातील 1 हजार युवकांना युवा वॉरियर्स च्या माध्यमातून जोडण्याचा कार्यक्रम घेणार असून प्रत्येक कॉलेज ला शाखा उघडून युवकाच्या समस्या सोडवणार आहे. अनुप मोरे हे प्रदेश अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वमध्ये युवा वॉरियर्स ही आघाडी अधिक मजबूत करणार आहोत.महाराष्ट्र मध्ये सगळ्यात पहिला व भव्य सत्कार करण्याची संधी पुणे शहराला दिल्या बद्दल पक्षाचे आभारी आहोत’.

राघवेंद्र मानकर म्हणाले,’पुण्यातून अनुप मोरे यांच्या सर्व उपक्रमांना खंबीर साथ दिली जाईल आणि पक्षाला पुढे नेण्यासाठी सहकार्य केले जाईल’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button