breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मंत्रिपदासाठी नाही तर दिलेल्या शब्दासाठी लढतोय’; भास्कर जाधव   

Bhaskar Jadhav : माझ्यावर अनेक आरोप करण्यात येत आहे. मंत्रीपद , गटनेते पदासाठी माझा हक्क असतानाही माझ्या पदरात काहीच पडले नाही, अशी नाराजी व्यक्त करतानाच  भास्कर जाधव यांनी  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचा शब्द दिला. त्यांच्यावर आरोपांची राळ उठल्यानंतर भास्कर जाधव यांनी आज आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

मी कुठे ही जाणार नाही, विदर्भातील, मराठवाड्यातील लोक मला तुम्ही अखेरचा यौद्धा असल्याचे सांगतात. उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  त्यांनी यावेळी मनातील खदखद व्यक्त केली. तर शिंदे गट फुटून गुवाहाटीला गेल्यावर पहिल्या बैठकीतील किस्सा पण सांगितला.

माझ्या पक्ष प्रमुखावर अन्याय झाला आहे. पक्षावर अन्याय झाला आहे. मी बोलत राहणार आहे. लढत राहणार आहे. पक्ष प्रमुखांनी मला विदर्भाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मोठे करायचे नाही. काम करायचे. ज्यावेळी एखादी व्यक्ती तुम्हाला ऐकत नाही. तुमच्या दबावात येत नाही. त्यावेळी तिला बदनाम करण्यात येते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्या वेळी भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही. आपल्या कुटुंबीयांना मागे ठेवत नाही माझे भाऊबंद हे सगळे पुढे असतात. कधीही माय पाठीमागे नसतात आणि त्याचे चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं बघितलं की नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांकडून सुनील शेळकेंवर दमदाटीचे आरोप; अजित पवारांकडून सडेतोड उत्तर

पक्षात फुट पडली. कोणी सुरत गेले. कोणी गुवाहाटीला गेले. त्यावेळी मला उद्धवसाहेबांचा फोन आला. त्यांनी ताबडतोब मुंबईला बोलवले. रात्री एक ट्रेन उशीरा होती. मुंबईत गेलो. अनेक आमदार तिथे उपस्थित होते. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितले की, वाटायला हवा. ज्याला खऱ्या अर्थाने स्वाभिमान काय तो कळतो. निष्ठा काहीतरी कळते. पक्ष प्रेम काय ते कळतं आणि ज्यांना खऱ्या अर्थाने भास्कर जाधव काय तो माहिती आहे त्यांना अभिमान वाटेल. असं पुढचं वाक्य सांगतो, मी तुम्हाला सगळ्यांचा ऐकून घेतलं मी काही बोललो नाही. भाजप आणि घडामोडींविषयी माहिती दिली. त्यावेळी मी म्हणालो, तुम्ही आमचे नेते तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या. पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतो तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो तुम्ही कुठेही जा पण जर भाजपबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. अशा शब्दात भास्कर जाधव यांनी भावना व्यक्त केल्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button