breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आणखी एक वेबसाईट ब्लॉक करण्याचे केंद्राचे आदेश

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
केंद्राने आणखी एका विदेशी वेबसाईटला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ”पंजाब पॉलिटिक्स टीव्ही”चे सर्व अॅप्स, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि वेबसाईट ब्लॉक करणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं  म्हटलं आहे. सामाजिक शांतता भंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सध्या पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यादरम्यान ”Punjab Politcs TV” हे चॅनेल राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी माहिती प्रसारीत करत आहे, अशी माहिती इंटलिजन्सकडून मिळाली. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं आयटी कायद्याअंतर्गत या मीडियाचे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत, असं केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५४ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश होता. नव्या बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आधी बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. मात्र ते क्लोन स्वरुपात पुन्हा समोर आले होते. २०२० नंतर देशात एकूण २७० अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने ५० आणखी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button