breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात ‘पिंक रिक्षा’ योजना लवकरच होणार सुरू! मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

मुंबई : राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्य सरकार एक नवी योजना आणणार आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

पिंक रिक्षा ही योजना राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या शहरांचा आहे. तसेच महिलांना सॅनिटरी पॅड पुरविण्यासाठी गरजू लाभार्थी निवड-निकष तपासून ही योजना यशस्वीपणे राज्यात राबवावी अशा सूचना आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा  –  इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे 

राज्यातील प्रत्येक बालकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वसमावेशक असे बालधोरण महिला व बालविकास विभाग तयार करत आहे. जनतेच्या हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विभागाने बालधोरणाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button