TOP Newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

देशात हार्ट अ‍ॅटॅकचं प्रमाण का वाढलं?

मुंबई :  कधीकाळी हार्ट अ‍ॅटॅक हा वृद्ध लोकांमधला आजार मानला जायचा. पण कोरोनानंतर तरुणांमध्ये येणाऱ्या हार्ट अ‍ॅटॅकचं प्रमाण चिंताजनक आहे. वाढत्या हार्ट अ‍ॅटॅकचा कोरोनाशी संबंध आहे का?

कधी लग्नात डान्स करताना तर कधी रामलीलेत अभिनय करताना, कधी जिममध्ये वर्कआऊट करता करताना तर कधी चालताना लोकांना अचानक ह्रदयविकाराचा झटका येतोय. त्यांचा जीव जातोय. विशेषत तरुणांमध्ये हार्ट अॅटकचं प्रमाण अचानक वाढताना दिसतंय. पण असं का होतंय? 2 वर्षात हार्ट अॅटॅकचं प्रमाण अचानक का वाढलंय, याचा कोरोनाशी काही संबंध आहे का यासंबंधी काही धक्कादायक अहवाल समोर आलेत. तज्ज्ञांच्या मते या अचानक हार्ट अॅटक वाढण्याला कोरोनाचे साईड-इफेक्ट म्हणता येईल. 

कोरोनामुळे हार्ट अटॅक वाढले?

तज्ज्ञांच्या मते कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम झालाय, ज्याचा थेट परिणाम ह्रदयावर होतोय. इतकंच नाही तर कोरोनानंतर ब्लड क्लॉटिंगचा त्रास सुरु होऊन ह्रदयरोगाचा धोका वाढतोय. भारतात कोरोना महामारी आणि हार्ट अॅटॅक कनेक्शनवर संशोधन झालेलं नाही पण आंतरराष्ट्रीय पातळीवर हार्ट अॅटकचा जसा ट्रेंड दिसतोय तोच भारतातही दिसतोय. हे अत्यंत चिंताजनक आहे.

कोरोनामुळे गंभीर आजारी असणा-या रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी होण्याचं प्रमाण सामान्य रुग्णांच्या तुलनेत 27 पटीनं जास्त असतं. कोरोनामुळे गंभीर आजारी रुग्णांमध्ये बरं झाल्यानंतर ह्रदय बंद पडण्याची शक्यता 21 पटीनं जास्त असते. गंभीर कोरोना रुग्णांना बरं झाल्यानंतर स्ट्रोक येण्याची शक्यता 17 पटीनं जास्त असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button