TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

पोट चरबी कमी करायचंय? मग वाट कसली बघताय, सकाळी-सकाळी प्या ‘हा’ चहा!

तज्ज्ञांनी सांगितलं की, जर आपण रोज एक खास हर्बल चहा प्यायलो तर वजन कमी करणं सोपं होईल आणि काही दिवसात आपल्याला पोटाचा घेर म्हणजेच बेली फॅट कमी होईल. वजन वाढण्यामागे सध्या चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. अनेकदा इच्छा असूनही चुकीच्या आहाराच्या सवयी सोडू शकत नाही.

नेटल टी प्यायल्याने वजन कमी होईल 

तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की कडक डाएट आणि वर्कआऊट करूनही वजन कमी होण्याचं नाव घेत नाही, अशा स्थितीत अनेक आरोग्य तज्ज्ञ ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात, पण तुम्ही एकदा नेटल टी जरूर ट्राय करा. लठ्ठपणाने ग्रस्त लोकांसाठी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीये. 

या वनस्पतीपासून नेटल टी तयार केला जातो.

नेटल टी हा एक विशेष प्रकारचा हर्बल चहा आहे. जो Nettle वनस्पतीपासून तयार केला जातो. हे बाजारात सहज उपलब्ध आहे आणि ते घरी बनवणं देखील खूप सोपं आहे. यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.

Nettle चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी, एंटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तसंच, हा चहा प्यायल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सारखे आवश्यक पोषक घटक मिळतात. या हर्बल चहाच्या मदतीने हृदयविकार, किडनीचे आजार, ऍलर्जी, सांधेदुखी यांसारख्या आजारांवर मात करता येते, तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

चहा पिण्याचे फायदे

तसंच ते तुमच्या शरीरातील सोडियम संतुलित ठेवण्याचे काम करतं. पोटात गॅसमुळे फुगल्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, तर तुम्ही नियमितपणे Nettle चहा प्यावा. Nettle चहा प्यायल्याने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button