breaking-newsमुंबईराजकारण

गृहमंत्री अमित शहांवर टीका करताना अनुराग कश्यपची जीभ घसरली!

मुंबई: गँग्स ऑफ वासेपूर, गुलाल यासारखे हिट चित्रपट बनवणारा निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. घटनात्मक पदावर असलेल्या अमित शहा यांना त्याने ‘भ्याड आणि जनावर’ म्हणून संबोधले आहे. अनुराग कश्यपने एका ट्वीट केले आहे. त्यावेळी अमित शहा यांच्यावर टीका करताना त्याची जीभ घसरली.

‘आमचे गृहमंत्री किती डरपोक आहेत. स्वतःचेच पोलीस, त्यांचेच गुंड, स्वतःचे लष्कर आणि स्वत:चीच सुरक्षा वाढवतो आणि निशस्त्र निदर्शकांवर हल्ला करवतो. जर नीचपणाची हद्द असेल तरी आहे. इतिहास या जनावरावर थुंकेल.’

अनुराग कश्यप यांच्या या वादग्रस्त ट्वीटनंतर युजर्सने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने अनुराग कश्यपच्या हे असंस्कारी असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी एका यूजरने कश्यपला असा सवाल विचारला आहे की, ‘आता आपण सीएएच्या विरोधासाठी पुढे आलात, पण जेव्हा काश्मिरी पंडितांनी धक्के मारून बाहेर काढलं जात होतं तेव्हा कुठे होता तुम्ही? याचवेळी, यूजरने अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button