breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बाबरी कुणी पाडली?, राऊतांनी फडणवीसांना दाखवला सर्वोच्च पुरावा, अडवाणींचा तो व्हिडिओ ट्विट!

मुंबई |

बाबरी मशीद कोणी पाडली यावरुन भाजप-शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस भडकत चालला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत याच विषयावरुन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेनेचे नेते कोणत्या बिळात होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता, असा दावाही फडणवीसांनी केला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ ट्विट करत सर्वोच्च पुरावा सादर केला आहे.

संजय राऊतांनी लालकृष्ण अडवाणींचा २९ डिसेंबर २००० रोजीचा व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलताना अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन तिथे मराठी लोक म्हणजेच शिवसैनिक उपस्थित असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून करण्यात आला आहे.

  • पाहा त्या व्हिडिओत अडवाणी काय म्हणाले –

“बाबरी मशीद पाडणे ही खूप मोठी चूक होती. त्यात काहीही शंका नाही. मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठवलं आणि सांगितलं की त्यांना खाली उतरवा. त्यांना सांगा की असं काही करु नका. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मशिदीवर काही लोक आहेत आणि ते ‘मराठी’त बोलत आहेत. ते माझं ऐकत नाहीयेत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांना पाठवलं. ते तिथे गेले. पण, तेही हताश होऊन परत आले. त्यांनंतर मी माझ्यासोबतच्या पोलिसांना सांगितलं की मला वर जायचं आहे. पण, ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याची परवागनी देऊ शकत नाही”.

त्यानंतर राऊतांनी आणखी एक ट्विट केलं. त्यामध्ये त्यांनी वृत्तपत्राचे काही कटआऊट्सचे फोटो टाकले आहेत. यामध्ये ‘शिवसेना कार्यकर्ता बॉम्ब घेऊन अयोध्येला जाणार’, ‘शिवसेना प्रदेश प्रमुखांच्या घरावर छापा’, ‘खवळलेल्या हिंदू महासागराने राजजन्मभूमीचा ताबा घेतला’, अशा बातम्यांचे हे कटआऊट्स आहेत. या ट्विटला संजय राऊतांनी ‘आता बोला..’ असं कॅप्शन दिलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button