breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

कोण आहे प्रथमा? तब्बल २,७०० किमीच्या प्रवासानंतर तुटला संपर्क

मुंबई: ‘प्रथमा’ या ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाशी संपर्क तुटला आहे. ‘प्रथमा’च्या पाठीवर सॅटेलाईट टॅग लावून त्याच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न वनविभागाकडून करण्यात आला होता. पण या प्रयत्नांना आता धक्का बसलाय. संपर्क तुटलेली ही दुसरी मादी कासव असल्याने कासवप्रेमींचा हिरमोड झालाय.

मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनने गुरुवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आम्ही २५ जानेवारी २०२२ रोजी रत्नागिरीतील वेळास येथे टॅग केलेल्या ‘प्रथमा’ कासवाचा सिग्नल गमावला आहे. उपग्रह ट्रान्समीटर अयशस्वी झाल्यामुळे प्रसारण थांबले असावे असा आमचा अंदाज आहे”. गेल्या ४ महिन्यात ‘प्रथमा’ने २ हजार ७०० किलोमीटर अंतर पार केले आहे. २४ मे पासून सिग्नल मिळायचा बंद झाला. ‘प्रथमा’च्या पाठीवर लावण्यात आलेले ट्रान्समीटर खराब झाल्याची शक्यता अधिक वाटते. या उटल ‘प्रथमा’चा मृत्यू झाल्याची शक्यता कमी वाटते, असे मानस मांजरेकर यांनी सांगितले. ‘प्रथमा’ने महाराष्ट्रातून दीवच्या किनाऱ्यापासून गुजरातपर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर ती माघारी फिरली आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे आली होती. तिचा शेवटचा सिग्नल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वरच्या किनाऱ्यापासून ६० किमी अंतरावर होता. तिच्या हालचालीचा पॅटर्न दक्षिणेकडे होता, असे मांजरेकर म्हणाले.

गुजरातकडे जाण्यापूर्वी ‘प्रथमा’ने दाभोळ खाडीत बराच वेळ घालवला. नदीच्या मुखाजवळ बरेच अन्न आहे, त्यामुळे ती येथे बराच वेळ थांबली असावी. ती गुजरातच्या पाण्यातही लांब फिरली, असे मांजरेकरांनी सांगितले. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञाद्वारे डेटाचे विश्लेषण केले जात आहे आणि विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट चित्र समोर येईल. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये, पाच ऑलिव्ह रिडले कासवांना प्रथमच पश्चिम किनारपट्टीवर उपग्रह-टॅग करण्यात आले होते. त्यांची जीवनशैली अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांच्या हालचालींचा वर्षभर अभ्यास करणे हा यामागचा उद्देश होता. दाभोळ येथे, जिथे तिने प्रथमने एक आठवडा घालवला, तेथे ती घरट्यात आल्याचा पुरावा आहे, परंतु तेथे खूप कचरा असल्याने प्रथमाने अंडी घातली नाहीत, असेही मांजरेकरांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button