breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

व्हाट्सअँपची मोठी घोषणा! ‘या’ स्मार्टफोन्सवर आता वापरता येणार नाही व्हाट्सअँप

Whatsapp : आपल्या युजर्सला अँप वापरताना चांगला अनुभव घेता यावा यासाठी व्हाटसअँप नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच यासाठी ते नवनवीन अपडेट्स देखील देत असतात. अँप युजर्सना वापरण्याकरिता सोपे व्हावे, तसेच वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षेची काळजी घेत व्हाट्सअँप नवनवीन अपडेट देत असते. विविध प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हाट्सअँप नेहमी नवनवीन अपडेट देत असते. मार्केटमध्ये जसजशा नवनवीन ऑपरेटिंग सिस्टम येतात त्यानुसार व्हाट्सअँप वापरकर्त्यांना नवनवीन अपडेट देत असते. तसेच व्हाट्सअँप दर वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या २४ तारखेला ज्या फोनवर व्हाट्सअँप चालणार नाही त्या फोनची यादी प्रसारित करत असते. त्यानुसार यावर्षी देखील व्हाट्सअँपने ही यादी प्रसारित केली आहे.

व्हाट्सअँपने याबाबत अलीकडेच एक महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार या महिन्याच्या २४ तारखेनंतर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या ४.१ या व्हर्जनच्या स्मार्टफोनवर येथून पुढे व्हात्साप्प सुरू राहणार नाहीये. म्हणजेच या अँड्रॉइड व्हर्जनचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना येथून पुढे त्यांच्या स्मार्टफोनवर व्हाट्सअँप वापरता येणार नाहीये.

हेही वाचा – ‘अजितदादांकडून पोलिसांच्या जमिनीचा लिलाव’; माजी IPS अधिकाऱ्याचा आरोप 

त्यामुळे जर तुमच्याकडेही अँड्रॉइडचा या व्हर्जनचा किंवा त्याआधीचा फोने असेल तर तो तात्काळ अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हाट्सअँपचा कोणत्याही त्रुटीशिवाय आनंद घेता येऊ शकतो. प्राथमिकदृष्ट्या विचार केला तर जुने झालेले फोन नवीन अपडेट केलेल्या अँपसाठी त्यांची सुरक्षा अपडेट करत नाही. त्यामुळे जुन्या फोनचा वापर करणे असुरक्षितच आहे. ज्यात तुमचा डेटा सुरक्षित राहत नाही. तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनच्या व्हर्जनविषयी माहिती नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन त्यांनंतर अबाउट फोन ऑप्शनवर जाऊन तुमचा अँड्रॉइड व्हर्जन नंबर तपासू शकता.

ज्या व्हाट्सअँप वापरकर्त्यांच्या स्मार्टफोन अजूनही ४.१ किंवा त्यापेक्षा जुन्या अँड्रॉइड व्हर्जनवर चालत आहे, त्यांना व्हाट्सअँपकडून पहिलेच माहिती देण्यात येणार आहे. तसेच वापरकर्त्याला व्हाट्सअँपकडून त्यांचा स्मार्टफोन अपडेट करण्याची सूचनाही देण्यात येणार आहे. आणि सूचना केल्यानांतरही वापरकर्त्याने त्यांचे अँड्रॉइड व्हर्जन अपडेट केले नाही तर अशा वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनवर व्हाट्सअँप काम करणार नाहीये. याचाच अर्थ तुम्ही व्हाट्सअँपच्या माध्यमातून कोणालाही मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट आणि तुमचे लोकेशन शेअर करू शकणार नाही आहात. यासोबतच तुम्हाला व्हाट्सएपच्या कोणतेही नवीन फिचर वापरता येणार नाहीये. कोणत्या कोणत्या जुन्या स्मार्टफोनवर व्हाट्सअँपची सेवा बंद होणार आहे ते फोने कोणते आहेत ते पाहुयात.

व्हाट्सअँप बंद होणाऱ्या स्मार्टफोनची यादी :

Nexus 7 (upgradable to Android 4.2)
Samsung Galaxy Note 2
HTC One
Sony Xperia Z
LG Optimus G Pro
Samsung Galaxy S2 S
amsung Galaxy Nexus
HTC Sensation
Motorola Droid Razr
Sony Xperia S2
Motorola Xoom
Samsung Galaxy Tab 10.1
Asus Eee Pad Transformer
Acer Iconia Tab A5003
Samsung Galaxy S
HTC Desire HD
LG Optimus 2X
Sony Ericsson Xperia Arc3

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button