breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईतील शेतकरी विद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना कोरोना;7 दिवस शाळा बंद

नवी मुंबई | प्रतिनिधी
घणसोली येथील शेतकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 2 दिवसात या शाळेतील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे विद्यार्थी 8 ते 12 या वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. उद्यापासून ही
शाळा ७ दिवस बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो मुलगा याच शाळेत येत होता. दरम्यान, या परदेशी व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शेतकरी विद्यालयातील 800 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली आहे. घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट मनपा घरी जावून करणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या 18 विद्यार्थ्यांवर वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व मुलांची प्रकृती ठीक आहे. घेत आहेत या शेतकरी विद्यालयात 8 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन चिंतेत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.

जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) कहर माजवला आहे. जगातील 77 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट प्रसार झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा इतर कोरोनाच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असून, वेगाने पसरणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने म्हटले आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनावर भर देत लक्षणे आणि उपाय शोधण्यासाठी परिश्रम घेत आहेत. एका संशोधनात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लक्षणांबाबत अभ्यास करण्यात आला. ओमायक्रॉन व्हेरियंट सध्या उपलब्ध कोरोना लसींना अत्यंत प्रतिरोधक आहे. उपलब्ध असलेल्या कोविडपैकी कोणतीही लस ओमायक्रॉन व्हेरियंटवर पूर्णपणे प्रभावी नाही. आतापर्यंतच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या तुलनेत या नवीन प्रकारामध्ये लक्षणे कमी गंभीर असल्याचे आढळून आले आहे

जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉनने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button