breaking-newsTOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडी

गौरी आणि गणपतीचे नाते काय? जाणून घ्या उत्तर

Jyeshtha Gauri Avahana 2023 : गणेशोत्सवाच्या काळात गौरींचही आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुल्क पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते.

गौरी आल्यानंतर ती २ दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झाल्यावर. दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना जेष्ठागौरी असं म्हणतात. प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं.

हेही वाचा – ‘१६ आमदारांची राजकीय तिरडी बांधली फक्त हे राम म्हणायचं बाकी’; संजय राऊतांचा हल्लाबोल

गौरी आणि गणपतीचं नातं काय?

काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानपन्न केलं जातं. गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद केला जातो. या दिवशी १६ भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ केले जातत. तर, याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत असते. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळं यांचाही नैवेद्य दाखवण्यात येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button