breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमेरिकेहून रेमडेसिविरच्या १२५००० कुप्या भारतात दाखल

नवी दिल्ली- भारतात दररोज तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये कोरोनासोबत लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे.

अमेरिकेकडून पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविरच्या १२५००० कुप्या आज दिल्ली विमानतळावर पोहोचल्या आहेत. यामुळे देशातील रेमडेसिविरचा तुडवडा कमी करण्यास मदत होईल. गेल्या शुक्रवारी अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिट कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले होते.

दरम्यान, लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी अमेरिकेने हटविण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मागील सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली होती. यावेळी ‘आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसेच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले’, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button