breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final ला पाऊस आला तर काय? जाणून घ्या ICC चा नियम

WTC Final २०२३ : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना येत्या ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील लंडन शहरातील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे संकट आहे. अशा परिस्थितीत जर पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन बनणार?

७ जून ते ११ जून या काळात हा सामना खेळला जाणार आहे. जर या सामन्यात पाऊस आला आणि सामन्याचा निकाल लागला नाही तर १२ जूनचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. राखीव दिवशी म्हणजे १२ जून रोजी जर पावसाचा जोर कायम राहिला तर काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. जर १२ जून रोजी सामन्याचा निकाल लागला नाही तर भारत-ऑस्ट्रेलिया यांना संयुक्तरित्या विजयी घोषित केलं जाईल.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Update : केरळमध्ये आज मान्सून दाखल होणार, महाराष्ट्रात कधी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहणे, केएस भारत, रवींद्र जडेजा, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, उस्मान खाजा, स्टीव्ह स्मिथ, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, स्कॉट बोलँड, जोश हेझलवूड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button