breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाखांच्या पुढे

मुंबई | सध्या कोरोनाच्या विळख्यामध्ये जगातील २०० पेक्षा जास्त अडकले आहेत. कोरोना विळखा हा दिवसेंदिवस घट्टच होत चालला आहे. जगात कोरोनाबाधितांचा आकडा हा ३५ लाखांच्याही पुढे गेला आहे. तर, मृत्यूची संख्या ही अडीच लाखांच्याही पार गेली आहे. एकीकडे बाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी लोकांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

आत्तापर्यंत जगात ११ लाखापेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दुसरकीकडे ज्या अमेरिकेत सगळ्यात जास्त कोरोनामूळे लोकांचा मृत्यू झाला. तेथील जीलिड या कंपनीने रेमिडिसीवीर हे ड्रग तयार केले आहे. ज्याचा अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर यशस्वी प्रयोग झाला आहे. या ड्रगमुळे कोरोनातून बरे होण्याच्या दिवसात १५ वरुन ११ दिवस अशी झाली आहे. परंतू, कोरोनाचा मृत्यूदर हा किती कमी होऊ शकतो याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button