आरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपलेख

तुम्हाला काय खायला आवडते? : बायकांपेक्षा पुरुषच जास्त मासे खातात!

राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण : मासे खाणाऱ्यांच्या प्रमाणात ६.१ टक्क्यांनी वाढ

महाईन्यूज ऑनलाईन: कोणाला काय खायला आवडते हे प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार ठरत असते. देशात अनेक वेळा शाकाहारी आणि मांसाहारी यावरूनसुद्धा वादविवाद होत असतात, परंतु हिंदुस्थान देश मासे खाण्यात जगात तिसरा ठरला असून यात बायकांपेक्षा पुरुषच जास्त मासे खातात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सर्वेक्षणानुसार, मासे खाणाऱया हिंदुस्थानातील लोकांचे प्रमाण 6.1 टक्क्यांनी वाढून ते 66 वरून 72.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच मासे खाण्यात हिंदुस्थान देश जगात तिसऱया स्थानी आला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मासे खाण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मासे खाण्यात मागे आहेत. सन 2047-48 पर्यंत दरडोई मासे खाण्याचे प्रमाण 41.29 किलोपर्यंत वाढण्याचा अंदाजसुद्धा या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

आहारातील माशांच्या समावेशाबाबत राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. हिंदुस्थान हा तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश असून, जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8 टक्के योगदान देतो. दरडोई मत्स्य अन्न पुरवठय़ाच्या बाबतीत, हिंदुस्थान 183 देशांमध्ये 129 व्या स्थानी आहे. दरडोई मासळीचा वापर 15 वर्षांत 8.89 किलोपर्यंत म्हणजे 81.43 टक्के वाढला आहे. मासे खाणाऱया लोकसंख्येमध्ये वार्षिक दरडोई वापर 66 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे वर्ल्ड फिश आंतरराष्ट्रीय अन्न धोरण आणि संशोधन संस्था (आयएफआरपी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (सीएजीआर) यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.

जम्मू-कश्मीरमध्येही माशांना पसंती

तामीळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांत सर्वात जास्त मासे खाल्ले जातात. या ठिकाणी जवळपास 90 टक्के लोक हे मासे खातात, तर पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत सर्वात कमी मासे खाल्ले जातात. या ठिकाणी केवळ 30 टक्के लोक मासे खातात. जम्मू-कश्मीरमध्ये मासे खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मासे खाण्यात मागे आहेत.

मासे खाण्यामध्ये हिंदुस्थान 183

देशांमध्ये 129 व्या स्थानी आहे. मासे खाणाऱया लोकसंख्येमध्ये वार्षिक दरडोई वापर 66 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
2005-21 या काळात देशातील मत्स्य उत्पादन दुपटीने वाढून 14.164 दशलक्ष टनावर पोहोचले. वार्षिक वाढ सरासरी 5.63 टक्के नोंदविण्यात आली.

​कोणाला काय खायला आवडते हे प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार ठरत असते. देशात अनेक वेळा शाकाहारी आणि मांसाहारी यावरूनसुद्धा वादविवाद होत असतात, परंतु हिंदुस्थान देश मासे खाण्यात जगात तिसरा ठरला असून यात बायकांपेक्षा पुरुषच जास्त मासे खातात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, मासे खाणाऱया हिंदुस्थानातील लोकांचे प्रमाण 6.1 टक्क्यांनी वाढून ते 66 वरून 72.1 टक्क्यांपर्यंत

कोणाला काय खायला आवडते हे प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार ठरत असते. देशात अनेक वेळा शाकाहारी आणि मांसाहारी यावरूनसुद्धा वादविवाद होत असतात, परंतु हिंदुस्थान देश मासे खाण्यात जगात तिसरा ठरला असून यात बायकांपेक्षा पुरुषच जास्त मासे खातात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सर्वेक्षणानुसार, मासे खाणाऱया हिंदुस्थानातील लोकांचे प्रमाण 6.1 टक्क्यांनी वाढून ते 66 वरून 72.1 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळेच मासे खाण्यात हिंदुस्थान देश जगात तिसऱया स्थानी आला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मासे खाण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मासे खाण्यात मागे आहेत. सन 2047-48 पर्यंत दरडोई मासे खाण्याचे प्रमाण 41.29 किलोपर्यंत वाढण्याचा अंदाजसुद्धा या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.

आहारातील माशांच्या समावेशाबाबत राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. हिंदुस्थान हा तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश असून, जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8 टक्के योगदान देतो. दरडोई मत्स्य अन्न पुरवठय़ाच्या बाबतीत, हिंदुस्थान 183 देशांमध्ये 129 व्या स्थानी आहे. दरडोई मासळीचा वापर 15 वर्षांत 8.89 किलोपर्यंत म्हणजे 81.43 टक्के वाढला आहे. मासे खाणाऱया लोकसंख्येमध्ये वार्षिक दरडोई वापर 66 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे वर्ल्ड फिश आंतरराष्ट्रीय अन्न धोरण आणि संशोधन संस्था (आयएफआरपी) व भारतीय कृषी संशोधन परिषद (सीएजीआर) यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.

जम्मू-कश्मीरमध्येही माशांना पसंती

तामीळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांत सर्वात जास्त मासे खाल्ले जातात. या ठिकाणी जवळपास 90 टक्के लोक हे मासे खातात, तर पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत सर्वात कमी मासे खाल्ले जातात. या ठिकाणी केवळ 30 टक्के लोक मासे खातात. जम्मू-कश्मीरमध्ये मासे खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मासे खाण्यात मागे आहेत.

मासे खाण्यामध्ये हिंदुस्थान 183

देशांमध्ये 129 व्या स्थानी आहे. मासे खाणाऱया लोकसंख्येमध्ये वार्षिक दरडोई वापर 66 टक्क्यांवरून 72 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
2005-21 या काळात देशातील मत्स्य उत्पादन दुपटीने वाढून 14.164 दशलक्ष टनावर पोहोचले. वार्षिक वाढ सरासरी 5.63 टक्के नोंदविण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button