breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; दर गुरूवारी पाणीपुरवठा बंद राहणार

'या' भागात असणार पाणी पुरवठा बंद

पुणे : पुण्यात पाणीकपात सुरू झाली असून १८ मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

महापालिकेने सांगितले आहे की, १८ मे पासून पुणे शहरातील एकदिवसीय पाणीकपात लागू होणार आहे. शहरात २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अधिक दाबाने पाणी मिळणार आहे. आगामी काळात पाऊस कमी पडला तर अत्यावश्यक प्लॅनिंग मनपा प्रशासन करीत आहे. स्विमिंग टँक बंद ठेवता येतील. मुळशी धरणातून ५ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ताथवडे येथे यशदाच्या वतीने सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येणार

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ९ टीएमसी पाणीसीठा शिल्लक आहे. तसेच यंदा अल निनोचं संकट ओढावण्याची शक्यता असलायाने पर्जन्यमान कमी राहणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ऑगस्टपर्यंत नियोजन करावे लागते. मात्र यंदा पाणी साठा कमी असल्याने त्यातच पाऊस कमी प्रमाणात होणार आहे. यामुळे पाणी पुरवठा जपून करावा किंवा पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग –

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button