breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पिंपरी : महापालिकेमार्फत होणारा गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी रावेत येथील जलउपसा केंद्र गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

हेही वाचा – चारही शंकराचार्यांना योगी आदित्यनाथ यांचं महत्वाचं आवाहन; म्हणाले..

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार १८ जानेवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच शुक्रवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button