ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी कैलास कुटे यांचा पुढाकार
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दहावी बस केली रवाना
सर्वसामान्य नागरिकांमधून उपक्रमाचे होतेय कौतूक
पिंपरी । प्रतिनिधी
आकुडी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांनी पुढाकार घेतला आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत नुकतीच १० वी बस रुग्णालयात पाठवण्यात आली.
परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते केलास गणपत कुटे यांच्यामार्फत मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे.
तसेच केलास कुटे यांनी अनेक प्रकारचे शस्त्रक्रिया असो सामाजिक कार्य, आरोग्य किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना असल्यास ते नागरिकांसाठी तसेच तळागाळातील गोर गरिबांसाठी ते पोचवण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशाच प्रकारे लाखो लोकांपर्यंत लोकसेवा घडत राहो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमात आकुर्डीत परिसरातील जेष्ठ नागरिक व महिला कार्यकत्या व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.