TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

डुडूळगाव परिसरातील पाणीपुरवठा होणार सक्षम!

आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते पाण्याच्या टाकीचे लोकार्पण; स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांसह ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून डुडूळगाव येथे तब्बल १५ लक्ष लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली. त्यामुळे पाणी पुरवठा सक्षम होणार असून, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ३ मधील डुडूळगाव येथे पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी रमेश वहिले, योगेश तळेकर, सचिन तळेकर, चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, विक्रम वहिले, सागर वहिले, दादा पवार, सचिन पवार, महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, कनिष्ठ अभियंता सुधाकर चव्हाण, विजय लाडे आदी उपस्थित होते.

या नवीन जलकुंभामुळे धायकरवस्ती, राजमाता कॉलेज परिसर, दत्तनगर, माउलीनगर, एसपी कॉलेज परिसर, ऑस्ट्रिया सोसायटी परिसर, डुडूळगाव गावठाण आदी भागाचा पाणीपुरवठा सक्षम होणार आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान ‘भोसरी व्हीजन- २०२०’ अभियानांतर्गत समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा सक्षम करण्याचा संकल्प आम्ही केला होता. महापालिकेच्या माध्यमातून डुडूळगाव, चोविसावाडी, वडमुखवाउी व चऱ्होली आदी भागांमध्ये मुख्य जलवाहिनी आणि आठ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. तसेच, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पामुळे समाविष्ट गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button