breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#WarAgainstVirus: कोरोनाचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ६ कोटी ५ लाख २ हजार रुपये निधी

बीड | महाईन्यूज |प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ६ कोटी ५ लाख २ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आतापर्यंत बीड जिल्ह्यात वार्षिक विकास योजनेतून कोरोना संदर्भातील विविध प्रतिबंधत्मक उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अन्य सुविधांसाठी ४ कोटी ६३ लाख ७५ हजार एवढा निधी देण्यात आला असून बीड जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्ड साठी स्वतंत्र ८१ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांची आवक हजारोंच्या संख्येने झालेली आहे. त्यादृष्टीने संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय योजना, व्यापक जनजागृती, मुबलक औषधोपचारांचा साठा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button