breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चंद्रावर पाणी सापडले, नासाचा दावा

नवी दिल्ली – गुरुत्वाकर्षण शुन्य असलेल्या चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. त्यांनी सोफिया हवाई वेधशाळेद्वारे शोधल्याचं म्हटलं आहे. चंद्रावरील हे पाणी साधन-संपत्ती समजायचं का हे अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र चंद्रावर पाणी सापडणं महत्त्वाचं मानलं जातं आहे असंही नासाने म्हटलं आहे. नासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे ट्विट काल करण्यात आलं आहे. नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/JimBridenstine/status/1320757460269895680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1320757460269895680%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_1&ref_url=http%3A%2F%2Fenavakal.com%2Fwater-on-the-moon%2F

अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही २०२४ पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

नासाने नेमकं काय म्हटलं आहे?
चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे. चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button