breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus | राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद
मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.
दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.