breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मान्सून मुंबईत धडकला! सर्वत्र धुवाँधार पाऊस

मुंबई – केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून मुंबईत धडकला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसराला रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपले आहे. दरवर्षी साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यावेळी त्याआधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक (डीडीजी) डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.

मुंबईत मान्सनचे आगमन झाल्यानंतर मुंबईतील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. दरम्यान, असाच पाऊस असाच सुरु राहिल्यास अनेक भागांमध्ये आणखी पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान कोकणसह मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. याची सुरुवात सर्वत्र पाहायला मिळत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button