breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: सरकारी आदेशाचे उल्लंघन; ४१५ अतिशहाण्यांवर कारवाई!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

शहरात सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास, विनाकारण घराबाहेर फिरल्यास, जमाव केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशा अतिशहाण्या तब्बल ४१५ जणांना पोलिसांनी दणका दिला आहे.

विशेष म्हणजे, शहर सील करूनही नागरिक घराबाहेर पडतच आहेत. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवरही कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईची आकडेवारी अशी आहे…

शहरात विनाकारण घराबाहेर फिरणे, एका ठिकाणी गर्दी करणे अशा कृत्यांवर देखील पोलीस बारीक लक्ष ठेऊन आहेत. असे प्रकार निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. मंगळवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (11), भोसरी (21), पिंपरी (6), चिंचवड (24), निगडी (15), आळंदी (5), चाकण (5), दिघी (15), म्हाळुंगे चौकी (1), वाकड (30), सांगवी (2), हिंजवडी (68), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (16), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (44), रावेत चौकी (5) एकूण 273 जणांवर कारवाई करण्यात आली. तर सीआरपीसी 149 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (72), पिंपरी (8), भोसरी (3), निगडी (10), दिघी (6), सांगवी (2), तळेगाव दाभाडे (17), चिखली (7), शिरगाव चौकी (8) एकूण 133 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चिखली, तळेगाव दाभाडे, दिघी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, चाकण दोन, पिंपरी पोलीस ठाण्यात चार मुंबई पोलीस कायदा कलम 65 ख, ड, ई, फ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button