breaking-newsपिंपरी / चिंचवड

नवीन उद्यानाच्या कामाला गती द्या; नगरसेविका आरती चोंधे यांच्या अधिका-यांना सूचना

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – प्रभाग क्रमांक 26, पिंपळे निलख येथील उद्यानाच्या आरक्षीत जागेची नगरसेविका आरती चोंधे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. अधिका-यांनी नियोजित उद्यानाच्या आराखड्याची माहिती सांगितली. त्यावर तातडीने उद्यानाच्या कामाला गती देण्यात यावी, अशा सूचना चोंधे यांनी अधिका-यांना दिल्या.

पिंपळे निलख येथील आरक्षण क्र. ३७४ मध्ये नव्यानेच विकसित होत असलेल्या  उद्यानाच्या कामाची सद्यस्थिती पाहण्यासाठी नगरसेविका चोंधे यांनी अधिका-यांना माहिती विचारली. त्यावर अधिका-यांनी सध्यस्थितीत होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. कामातील त्रुटींवर चोंधे यांनी अधिका-यांशी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत कामाचा दर्जा टिकवून ठेवावा. तसेच, तातडीने हे काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

यावेळी पवन कामठे, उद्यान स्थापत्य अधिकारी भगवानराव मोरे आणि बीव्हिजी ग्रुपचे आधिकारी उपस्थीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button