breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: पिंपळे गुरव येथील ‘त्या ’ तीन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रूग्णालयात मंगळवारी (दि. 28) पिंपळेगुरव येथून दाखल झालेल्या 3 करोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता रुग्णालयात दाखल असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 17 इतकी झाली आहे. नव्याने पॉझिटिव्ह अहवाल आलेले तिन्ही रुग्ण एकाच कुटूंबातील आहेत.

60 वर्षाची ज्येष्ठ महिला, तिची 36 वर्षीय मुलगी आणि 10 वर्षाचा नातू अशा तिघांचा त्यामध्ये समावेश आहे. संबंधितांना मंगळवारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची करोनाविषयक चाचणी घेतल्यानंतर त्यामध्ये तिघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात सुरवातीला 14 रुग्ण होते. त्यातील बारामती येथील चौघांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर, दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णालयात 25 तारखेपर्यंत आठच रुग्ण शिल्लक होते.

मात्र, सद्य:स्थितीत रुग्णालयामध्ये एकूण 17 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 6 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, 24 करोना संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button