breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: पिंपरी-चिंचवडमधील आणखी सहाजणांना कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 121 वर!

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील आज सहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले असून, त्यामध्ये एका 71 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह 4 महिला व 2 तरुणांचा समावेश आहे. आजच्या सहा बाधितांमुळे शहरातील करोनाग्रस्तांची संख्या 121 वर पोहोचली आहे.

गुरुवार ते शनिवार बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात घसरला होता. शुक्रवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळून न आल्यामुळे समाधानाचे वातावरण होते. मात्र रविवारी अचानक बाधितांच्या संख्येमध्ये सहाने भर पडली आहे. हे सहाही जण बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट’मधील आहेत. शनिवारी प्रतिक्षेत असलेला अहवाल रविवारी प्राप्त झाल्यानंतर त्यामधील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज 6 जणांना करोना विषाणूची लागण झाली. त्यामध्ये 21 व 22 वर्षीय दोन तरुण असून, 14 ते 40 वर्षांतील तीन महिला व 71 वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण पिंपळे सौदागर, चिंचवड, जुनी सांगवी व मोशी या परिसरातील आहेत. हे रुग्ण सापडल्यानंतर वरील तीनही परिसर कंटनेमेंट झोन म्हणून आयुक्तांनी जाहीर केले आहेत. तर वडगाव शेरी येथील रहिवाशी असलेल्या एकावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचे दोन्ही वेळचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे करोनावर मात करणाऱ्यांची संख्या 50 वर पोहोचली आहे.

आज रविवारी नव्याने 98 संशयीत महापालिकेच्या वायसीएममध्ये दाखल झाले असून, त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 3064 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले, त्यापैकी 2847 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आज संशयीत म्हणून दाखल झालेल्यांच्या घशातील स्वॅबचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्या 98 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. करोनामुळे आजपर्यंत एकुण 5 जणांचे निधन झाले असून त्यामध्ये शहरातील तिघांचा तर शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button