breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

भाजपा नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला अटक

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे. धमकी देत खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. विशेष तपास टीमकडून (एसआयटी) ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खंडणी मागितली जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरोधात पोलिसांनी खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात हजर केलं असता तरुणीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यता आली.

विद्यार्थिनीच्या वकिलाचा आरोप आहे की, एसआयटीने मुलीला चप्पलही घालू दिली नाही आणि जबरदस्ती ओढत रुममधून बाहेर नेत अटक करण्यात आली. मंगळवारी स्थानिक न्यायालयाने मंगळवारी विद्यार्थिनीची अटकपूर्व जामीन याचिका स्विकारली होती, पण अटकेवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनीदेखील अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अटक केल्यानंतर विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं.

मंगळवारी न्यायालयाने विद्यार्थिनीच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेतली होती. चिन्मयानंद यांच्या वकिलांनी विद्यार्थिनीच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आक्षेप नोंदवला होता. जवळपास ४० मिनिटं दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने विद्यार्थिनीची याचिका मंजूर केली होती. पीडितेच्या वकिलाने पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगितलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button