breaking-newsताज्या घडामोडी

#Waragainstcorona: जिल्ह्यातील 16 निवारागृहांमध्ये राज्यातील 165 परराज्यातील 658 : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

जिल्ह्यातील 16 निवारागृहांमध्ये राज्यातील 165 आणि परराज्यातील 658 अशा एकूण 823 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

        कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील  22 परराज्यातील 6 अशा 28 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील 20 परराज्यातील 9 अशा 29 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे. मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार येथे राज्यातील 8 परराज्यातील 15  असे एकूण 23 असून याची क्षमता 25 जणांची आहे.

       करवीर – सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील 2 परराज्यातील 34 एकूण 36 जण असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी – राज्यातील 9, परराज्यातील 35 असे एकूण 44 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.          कागल – जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 25 परराज्यातील 128 असे एकूण 153 जण असून क्षमता 250 जणांची आहे. नवोदय विद्यालय, कागल – परराज्यातील 84 एकूण 84 जण असून क्षमता 150 आहे.

        हातकणंगले -घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे राज्यातील 1 परराज्यातील 86 असे एकूण 87 जण असून क्षमता 100 जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील 2 परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता 115 जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 36 परराज्यातील 8 एकूण 44 जण असून क्षमता 55 जणांची आहे. 

          शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 13 परराज्यातील 17 असे एकूण 30 क्षमता 50 आहे. जैन सांस्कृतिक भवन कुरूंदवाड येथे राज्यातील 3 परराज्यातील 6 एकूण 9 क्षमता 50 आहे. उर्दू हायस्कूल जयसिंगपूर येथे परराज्यातील 27 एकूण 27 क्षमता 50 आहे.

        गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील 6 परराज्यातील 1 असे  एकूण 7 असून क्षमता 24 जणांची आहे.

          गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यातील 13 जण असून क्षमता 20 जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 5 परराज्यातील 97 असे एकूण 102 असून क्षमता 105 जणांची आहे.

यामध्ये कर्नाटकातील 246,

तामिळनाडूमधील 210,

राजस्थानमधील 84,

मध्यप्रदेशमधील 54,

उत्तर प्रदेशमधील 40,

केरळमधील 8,

पाँडेचरीमधील 1,

पश्चिम बंगालमधील 1,

आंध्रप्रदेश  3,

झारखंड  5,

बिहार 1,

हरियाणा 4 अशा एकूण 12 राज्यातील 657 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 165 असे मिळून 822 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button